आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

पेण रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय सुसज्ज दर्जाचे उभारणार : खासदार सुनील तटकरे

गडब (अवंतिका म्हात्रे)- पेण रेल्वे स्थानकाचे अद्ययावत नूतनीकरण करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. खासदार सुनील तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील यांच्या उपस्थितीत पेण रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरण पेण नगरपालिका सभागृहात करण्यात आले.
     पेण हे गणरायाच्या मूर्तींचे माहेरघर असून, येथील मूर्ती जगप्रसिद्ध आहेत. पेणच्या या ऐतिहासिक शहरातील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
      यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील, नगरसेविका वसुधा पाटील, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, आनंद जाधव, दीपक गुरव, अभिराज कडू, नगरसेविका शशिकला पाटील, सुनीता जोशी, मालती म्हात्रे, आफरीन अखवारे, पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष उदय चौकशी पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील, विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष चैताली पाटील,शहर महिला अध्यक्ष सुचिता चव्हाण,दादर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप म्हात्रे, दादर पंचायत समिती अध्यक्ष नाशिक येथे मोकल कोळी सेल अध्यक्ष बिपिन पाटील,विद्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील आदिवासी सेल अध्यक्ष प्रभाकर शिंदे, दिव्यांग प्रहार संघटना अध्यक्ष भालचंद्र भगत,तालुका सचिव नरेंद्र म्हात्रे,संजय भोईर, विजय कदम,विवेक सावंत,युवक उपाध्यक्ष कैलास रुठे, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष गणेश घरत, ' अॅड. मंगेश नेने, ललित पाटील, राजू पिचिका आदी उपस्थित होते.
     दरम्यान, पेण नगरपरिषदेच्या सभागृहाला स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याबद्दल यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
     खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पेण रेल्वे स्थानक अद्ययावत होणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक उभारले जाणार आहे. गणरायाच्या मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेण शहरातून जगभरात गणरायाच्या मूर्ती पाठवल्या जातात. अशा ऐतिहासिक शहराच्या रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याचे आज सादरीकरण करण्यात आले.
     मध्यंतरी रोहा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला मान्यता घेतली होती. त्यावेळी पेणच्या प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांनी मला रात्री उशिरा संदेश पाठवला होता. त्यावर मी त्यांना पेणच्या रेल्वे स्थानकाच्या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. त्यावेळी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सहकारी उपस्थित होते.
    आज पेण रेल्वे स्थानकाच्या कायापालटाचा आराखडा सादर करण्यात आला. भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक सुंदर आणि सुसज्ज पेण रेल्वे स्थानक पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिवेशनाच्या वेळी भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्याकडे पेण रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाबाबत विनंती केली होती. तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही याबाबत मागणी केली होती. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती.
   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर एका उत्कृष्ट वास्तुविशारदामार्फत हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना या आराखड्यातून पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
   लोकसभा सदस्य म्हणून पेणकरांच्या रेल्वे प्रवासात तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मनात पेण रेल्वे स्थानक आनंद निर्माण करणारे ठरेल, याचा मला अभिमान वाटेल, असेही खासदार तटकरे यांनी सांगितले.
    पेण नगरपरिषदेच्या सभागृहाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका आणि संपूर्ण सभागृहाचे मनःपूर्वक आभार मानले.
      पेण शहरातील विविध विकासकामांसाठी अजितदादा पवार यांनी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करणारा आणि राजकीय बांधिलकी जपणारा नेता म्हणून अजितदादांची महाराष्ट्रात आणि देशात ओळख होती. नगरपालिकेने तसेच आमदारांनी शहरातील विविध कामांसाठी निधीची मागणी केली असता त्यांनी तो उपलब्ध करून दिला.
   ..आता या सभागृहाचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यात येणार असून, त्याला अजितदादा पवार यांचे नाव दिले जात असल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. याबद्दल पेणचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, बांधकाम सभापती तसेच सर्व सभापतींचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...