आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

श्रीमती अर्चना राकेश जाधव यांचा मा.राष्ट्रपतीच्या हस्ते "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026" प्रदान करून सन्मान!!

मुंबई(प्रदीप  जोशी)  :- नाशिक येथील दादासाहेब फाळके शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था त्रंबकेश्वर येथे फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी ट्रेड विभागात श्रीमती अर्चना राकेश जाधव निदेशिका या पदावर कार्यरत असून त्यांच्या कठोर परिश्रम आणि शैक्षणिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाचे कौतुक म्हणून त्यांची निवड "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 " करण्यात आली. दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीमती अर्चना राकेश जाधव (मोरे )मॅडम यांना भारताचे राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार -2026"प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्रंबकेश्वर ITI साठी हा क्षण ऐतिहासिक आणि अभिमानाचा असून हा मानाचा तुरा नाशिककर यांनी मिळविला आहे.त्यामुळं शिक्षक, विद्यार्थी व नातेवाईक यांच्यात सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा बहुमान मिळाल्याबद्दल श्रीमती अर्चना राकेश जाधव (मोरे )मॅडम यांच्यावर चहुबाजूने अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...