आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई (मान्यताप्राप्त शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन संस्था)आयोजित राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा - २०२६

मुंबई : वैदिक संस्कृतीचा जतन व संवर्धन "कर्तृत्वाला मिळते जेव्हा राष्ट्रीय प्रतिष्ठेची झालर, तेव्हाच साकारते एका समृद्ध आणि उन्नत भारताचे स्वप्न !" प्राचीन वैदिक ज्ञानपरंपरेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या निष्ठावंत गुणवंतांना यंदाच्या मानाच्या 'राष्ट्रीय गौरव पुरस्कारांनी' सन्मानित करण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वेळेत गुरुकुल हॉल, दादर (पश्चिम), मुंबई याठिकाणी आयोजित केला आहे.
     या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि सन्माननीय पुरस्कारार्थीच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आपण नक्की उपस्थित रहावे, असे आग्रहाचे निमंत्रण संस्थेमार्फत देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी - भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई. संपर्क: ९३२३०६८८७३ / ९९६७५२३६०९ संकेतस्थळ: www.bharativedic.org 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा - जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन

रायगड  : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ...