आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

घोगाव जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा ‘धगधगती मुंबई’तर्फे सन्मान

कराड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोगाव येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करून राज्य पातळीवर आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवार आणि संत रोहिदास मित्र मंडळ, घोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
       या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ. सविता सचिन राजमाने मॅडम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य वसंत धुळपसर आणि ‘धगधगती मुंबई’चे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
       यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनंत भंडारे, शिक्षक बाजीराव शेटे, दत्तात्रय कुंभार, राहुल पावले, तसेच घोगावचे प्रतिष्ठित नागरिक शंकर पाटील आबा, उपसरपंच निवास शेवाळे, बाजीराव तांबेकर, पोलीस पाटील शिवाजी भावके, जगताप सर, संत रोहिदास मित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, विकास साळुंखे, ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        यावेळी बोलताना संपादक भीमराव धुळप म्हणाले, “जुन्या आठवणींना उजाळा देताना आपल्या पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप द्यावी, ही भावना आम्हीही शाळेत असताना अनुभवली आहे. आज याच शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी खास मुंबईहून घोगाव येथे येऊन त्यांचा सन्मान करता आला, याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे.”
         या उपक्रमांतर्गत सौ. महानंदा वसंत धुळप यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कंपनीचे कंपास भेट देण्यात आले. तसेच ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्र परिवाराच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी टेबल पेन-घड्याळाची भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा - जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन

रायगड  : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ...