गायिका-आयोजिका शर्मिला केसरकर यांच्या म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या वतीने"युही गाते रहो"या संगीतमय(ऑर्केस्ट्रा) कार्यक्रमाचे आयोजन २९ ऑगस्ट २०२६रोजी सांयकाळी ५ते ९ यावेळात BPIS School(Ac Hall) मुलुंड पूर्व येथे संपन्न होत आहे.प्रमुख अतिथी म्हणून ॲंन्टीपायरसी सेल मुंबई चे मुख्य तपासी अधिकारी, समाजसेवक रामजित(जितू) गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत.अशा या संगीतमय कार्यक्रमाला उषा हाॅस्पिटलीटीचे संचालक अरविंद सुर्वे यांचेही सहकार्य लाभत असते.याप्रसंगी म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून तनया केसरकर या कार्यभार सांभाळत आहेत.'
युही गाते रहो'या संगीतमय (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रमात नामांकित सिंगर आपली गायिकी सादर करणार आहेत.या संगीतमय कार्यक्रमासाठी श्रवणीय रसिकांनी नविन-जुन्या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या संचालिका, समाजसेविका, गायिका शर्मिला केसरकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा