आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

लोककलेच्या सुरांनी रंगली विरारची रात्र; गरजू विद्यार्थ्यांसाठी समाजबांधवांचा मदतीचा हात ; कुणबी युवा शाखा विरार बनत आहे. निराधारांचा आधार !!

मुंबई (दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर)- कोकणच्या मातीत रुजलेली पारंपरिक ‘कलगी तुरा (शक्ती तुरा)’ लोककला, हजारो समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी, अशा उत्साहपूर्ण वातावरणात विरारमध्ये कलगी तुरा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.
       कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई – विभागीय शाखा विरार, कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ, विरार यांच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी निधी संकलनार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कलगीवाले शाहीर कु. रोहित तूपट, तुरेवाले शाहीर श्री. नितीन जाधव आणि शाहीर श्री. रुपेश हातणकर यांनी दमदार सवाल-जवाब आणि पारंपरिक कलाविष्कारातून उपस्थित रसिकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यांच्या सादरीकरणाला समाजबांधवांनी उत्स्फूर्त दाद देत मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे विरारची रात्र लोककलेच्या सुरांनी आणि जल्लोषाने अक्षरशः रंगून गेली.
       यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे समाजबांधव तथा पत्रकार श्री. दीपक मांडवकर साहेब आणि कुणबी समाजोन्नती संघाच्या विभागीय शाखेचे सरचिटणीस श्री. एकनाथ डिंगणकर साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे माजी सरचिटणीस श्री. राजाराम कातकर, पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय चोघळा, कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष श्री. संतोष (युवराज) कांबळे, युवा सरचिटणीस श्री. सचिन रामाणे, युवा सहसचिव श्री. अविनाश आग्रे, श्री. भास्कर पवार, , सुप्रिया ट्रॅव्हल्सचे संचालक श्री. बाळकृष्ण म्हसकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे संपादक श्री. गायकवाड, दीप प्रकाश हॉलचे संचालक श्री. दीपक बेनकर, सह्याद्री नगर सेवा संस्थेचे पदाधिकारी तसेच श्री. राजेंद्र गावडे, श्री. विक्रम चाळके, श्री. परशुराम नाईक, श्री गुरव काका, जनसेवक आयु. अशोक कदम,मधुकर शिंदे, कलगीवाले युवा शाहीर रोहित तुपट यांचे गुरुवर्य शाहीर मुरकर माऊली,रत्नागिरी ऑप्टिक्सचें मालक अजय डिंगणकर, श्री मिलिंद पाटील(विरार फाटा )पोलीस पाटील ),संतसेवा भजन मंडळ सामाजिक संस्था (पश्चिम रेल्वे ) संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी पाटील माऊली, सचिव श्री विनोद चव्हाण,श्री मिलिंद सुलतान, श्री अनंत राऊत शिरसाठ, श्री सतीश साखरे, समाजसेवक दिनेश निर्मळ, शिर प्रतिष्ठानचें अध्यक्ष श्री नितीन ठोंबरे, जनसेविका सौ हळदणकर ताई,शाहीर नितीन आंब्रे,युवा शाहीर योगेश घाणेकर,शाहीर अमित पेजले, शाहीर संतोष पारदले यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. एकनाथ डिंगणकर आणि श्री. शैलेश बामणे यांनी केले.‘गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत, विद्यार्थ्यांसाठी नवी उमेद’ या भावनेतून आयोजित हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचा न राहता लोककलेचा वारसा जपत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समाजाची एकजूट दाखवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघ, विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी, कुणबी युवा विरार, कुणबी महिला मंडळ, विरारचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विभागीय शाखा विरारचे शाखाध्यक्ष श्री. किशोर भेरे, कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. संगीताताई भेरे आणि कुणबी युवा विरारचे युवाध्यक्ष श्री. अविनाश पाचकले यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोककलेच्या सुरांनी रंगली विरारची रात्र; गरजू विद्यार्थ्यांसाठी समाजबांधवांचा मदतीचा हात ; कुणबी युवा शाखा विरार बनत आहे. निराधारांचा आधार !!

मुंबई (दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर)-  कोकणच्या मातीत रुजलेली पारंपरिक ‘कलगी तुरा (शक्ती तुरा)’ लोककला, हजारो समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्...