गडब (अवंतिका म्हात्रे)- महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षण संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच कळंबोली, पनवेल येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात कोकण विभागातील गुणवंत शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यात पेण एज्युकेशन सोसायटीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले. शिक्षण आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष मंगेशदादा नेने, खजिनदार संजयजी कडू आणि संचालक अमित देव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेतील दोन शिक्षकांचाही गुणवंत शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. “मी स्वतः शिक्षक होतो. विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना घडवत आहेत. त्यामध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे योगदान उल्लेखनीय आहे. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. अशा संस्थेचा सन्मान होताना आम्हालाही अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनीही शिक्षक आणि शिक्षण संस्थांच्या कार्याचे कौतुक केले. “मीसुद्धा एक विद्यार्थी होतो. आज माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत,”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा