आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

जनजागृती सेवा संस्थेतर्फे ‘सिंधुरत्न महिला दशावतार’ कलाकारांचा गौरव ;कणकवलीत महिला दशावतार कलाकारांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

गडब (अवंतिका म्हात्रे)- कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या दशावतार या लोककलेच्या माध्यमातून सांस्कृतिक जनजागृतीचे कार्य करणाऱ्या महिला दशावतार कलाकारांचा गौरव सोहळा कणकवली येथे उत्साहात पार पडला.
     जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांच्या वतीने कणकवली येथील ‘सिंधुरत्न महिला दशावतार’ नाट्य मंडळातील महिला व पुरुष कलाकारांचा भव्य सत्कार भवानी सभागृह, तेली आळी, कणकवली येथे करण्यात आला. गणेश प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
      यावेळी व्यासपीठावर जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, संस्थेचे सल्लागार अरविंद सुर्वे, सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाच्या अध्यक्षा व अभिनेत्री अक्षता कांबळी, लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड उपस्थित होते.
     जनजागृती सेवा संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती देताना अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून कोकणासह सहा जिल्ह्यांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. पत्रकारिता, गरजूंना वस्तू वाटप, अन्नदान, दीपावली फराळ वाटप, महिला दिन, शिक्षक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती तसेच ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र संपादकांचा सत्कार अशा विविध उपक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.
     दशावतार कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या ‘सिंधुरत्न महिला दशावतार’ मंडळाच्या अध्यक्षा अक्षता कांबळी यांच्यासह मंडळातील महिला उपस्थित होत्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव (पूर्व ) येथे जेष्ठ नागरिकांचे एकत्रित जन्म दिन जल्लोषात संपन्न!

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन,  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहर, व श्रीकृष्ण महिला बालकल्याण ...