मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहर, व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, विरंगुळा केंद्र, संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ, गोरेगाव (पूर्व )मोठ्या आनंदी व सकारात्मक वातावरणात संपन्न झाले.
संकल्प ज्येष्ठ नागरिक संघ वतीने ज्येष्ठ्यांचे वाढदिवस प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी केले जातात. त्या निमित्ताने शासनाचा, १९ व्या शतकातील जुनी मराठी, हिंदी गाणी, भक्ती गीते, भावगीते, मालवणी गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गायक भरत कस्तुर, अशोक अंबुले, नंदकिशोर भुर्के व माधुरी करंडे यांच्या गाण्यानी, ज्येष्ठाना मंत्रमुध केले. त्यांना साथ, राजरत्न कदम, दिलीप (भाऊ ) मेस्त्री, दत्ताराम घाडी, शैलेश तुम्म व कांतीलाल परमार यांनी दिली.
श्री गणेश प्रतिमेस व छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. ९ ज्येष्ठाना, त्यांच्या जन्म दिनाच्या निमित्त भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. व त्यांच्याच हस्ते केक कापण्यात आला.१२ ज्येष्ठानी ' त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.
या सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष -दिलीप धारकर, सचिव - सूर्यकांत सोडये सह सर्व पदाधिकारी, महिला- पुरुष सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन - शांताराम का. खामकर व शितल शा. खामकर यांनी अतिशय उत्कृष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा