आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

तुम्ही आमचे रक्षण करता... म्हणून आज आम्ही तुम्हाला राखी बांधतो!

जोगेश्वरी : अस्मिता संचालित रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय, जोगेश्वरी येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमातून पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील स्नेह, विश्वास व सुरक्षिततेचा भावनिक बंध अधोरेखित झाला.
        विद्यालयातील कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने झाली. कु. अवनी ओव्हाळ हिने मराठीत, तर कु. युवराज्ञी शिंदे हिने संस्कृतमध्ये रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. वर्गावर्गात रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू असताना विद्यार्थ्यांनी सामूहिक संस्कृत श्लोकांचे पठण केल्याने वातावरण मंगलमय झाले.
      यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रशेखर पारखी तसेच अस्मिता संस्थेतील सर्व सेवाव्रतींना राखी बांधून स्नेहबंध दृढ केला.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. इकबाल शिकलकर, महिला पोलीस निरीक्षका लांडगे मॅडम, तपासे साहेब व कोळी साहेब तसेच इतर सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचा सन्मान केला.
        यावेळी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकलकर साहेबांशी संवाद साधताना प्रेमाने विचारले, “आम्हाला भेटायला येणाऱ्या पोलीस दीदी कुठे आहेत? आम्हाला त्यांनाही राखी बांधायची आहे. त्या आम्हाला नेहमी स्वतः: चे रक्षण कसे करायचे आपली आणि आपल्या बरोबरच्या मित्र मैत्रिणीची सुरक्षा कशी करायची." विद्यार्थ्यांच्या या निरागस भावनेतून विद्यालयात यापूर्वी झालेल्या ‘पोलीस दीदी’ कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पोलिसांविषयी निर्माण झालेला विश्वास व जिव्हाळा स्पष्टपणे दिसून आला. विद्यार्थ्यांच्या राख्या पोलीस दीदींपर्यंत पोहोचवून त्यांना बांधण्याचे आश्वासन शिकलकर साहेबांनी दिले.
जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थिनी लावण्या राऊळ हिने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “तुम्ही आमचे संरक्षण करता. रोज शाळा भरताना व सुटताना आमची काळजी घेता. त्यामुळे आम्ही सुरक्षितपणे आणि न घाबरता शाळेत येतो.”
          विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रचना पवार यांनी विद्यार्थी व पालकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. अस्मिता संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी राखी विद्यार्थ्यांच्या घरी पाठविण्यात आली असून ती आपल्या कुटुंबीयांना बांधून सामाजिक बंध अधिक दृढ करावेत, असे आवाहन त्यांनी केले. विशेष कौतुक इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचे की त्यांनी स्वतः ज्याप्रमाणे बाजारात राखी मिळते अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या विद्यार्थ्यांनी स्वतः दोरा मणी वेगवेगळे डेकोरेशन चे साहित्य वापरून हुबेहूब बाजारात मिळतात अशा राख्या तयार केल्या. यातून शाळा विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध उपजीविकांचे महत्त्व आणि कुछविकेच्या साधनांची ओळख करून देखील देत आहे.
रक्षाबंधनाचा उत्सव केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलिसांप्रती सन्मान, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या मनगटावर बांधलेली राखी हा केवळ धागा नसून “तुम्ही आमची काळजी घेता, आम्ही तुमचा सन्मान करतो” या भावनेचा सुंदर संदेश ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव (पूर्व ) येथे जेष्ठ नागरिकांचे एकत्रित जन्म दिन जल्लोषात संपन्न!

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन,  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, मुंबई शहर, व श्रीकृष्ण महिला बालकल्याण ...