आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीत महिला सक्षमीकरणावर भर; स्वच्छता, आरोग्य व रोजगार विषयक मार्गदर्शन

गडब (अवंतिका म्हात्रे)  ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील महिलांसाठी गुरुवार, दि. 6 ऑगस्ट रोजी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने विविध जनजागृती व मार्गदर्शनपर उपक्रम उत्साहात पार पडले. पंचायत समिती सदस्य सौ. प्रीती प्रशांत पाटील यांच्या पुढाकारातून, ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या सरपंच सौ .मानसी मंगेश पाटील यांच्या सहकार्याने तसेच JSW Foundation च्या CSR विभागाच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमात घनकचरा व्यवस्थापन, रोजगाराच्या संधी आणि महिला आरोग्य जनजागृती या तीन महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
   घनकचरा व्यवस्थापन विषयात "माझा गाव स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त गाव" या संकल्पनेवर भर देण्यात आला. ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे योग्य नियोजन करणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
      यानंतर JSW Skill School च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधी, विशेषतः नर्सिंगसारख्या अभ्यासक्रमांद्वारे महिलांना करिअरच्या उपलब्ध होणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
   महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्या, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी डॉ. दिपाली यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.
   या कार्यक्रमासाठी JSW Skill School यांच्या रोशनी मॅडम, JSW Foundation CSR विभागाचे गणेश सर तसेच इकोसनचे घनकचरा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. मुनिकर मुजावर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
     महिला सक्षमीकरण, स्वच्छता, आरोग्य आणि रोजगार या विषयांबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...