आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ

मुंबई:  सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई,  यांच्या वतीने,  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळगाव असलेली  व मराठा ज्ञातीतील ज्या मुला/मुलीनी मुंबई शहर व उपनगर परिसरातील शाळा-कॉलेज मध्ये शिक्षण घेत  असताना   सन २०२५-२६ या  शैक्षणिक  वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले  विद्यार्थी , इ. १० वी च्या  परीक्षेत ८० टक्के, १२ वीत ७५ टक्के (विज्ञान व वाणिज्य शाखा), ७०  टक्के ( कला शाखा )  व त्याहून अधिक गुण संपादन केले आहेत, विविध शाखेतील  पदविका, पदवी व उच्च पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांना, संस्थेच्या वार्षिक स्नेह-संमेलनात रोख रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात  येणार आहे. तरी वरील प्रमाणे यश संपादन केलेल्या विद्यार्थांनी आपल्या गुण पत्रिकेची छायांकित प्रत, संपूर्ण नाव, मुंबईतील पत्ता, गावचा  पत्ता, टेलीफोन क्र /मोबाईल क्र. मराठी  मध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी, सावंतवाडी संस्थान मराठा समाज,मुंबई,  स्टार मॉल, ३रा  मजला, न. चिं. केळकर मार्ग, दादर (पाश्चिम), मुंबई ४०००२८ या पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहिती साठी संपर्क ( सोमवार सोडून ) बाळा पाताडे - 9137469348( सायं.३ ते ६ ) यांना करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...