उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील बौद्ध धर्मातील नागरिकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण करण्याबरोबरच धार्मिक व शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी उरण तालुक्यातील बौद्ध समाजातील नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून उरण तालुका बौद्धधम्म संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिनेश गायकवाड, सुनील गायकवाड, परशुराम शिवशरण, एन. बी. कुरणे, सुनील जाधव आणि शैलेश तांमगाडगे, कार्याध्यक्षपदी ॲड. निलेश मर्चंड, सहकार्याध्यक्षपदी डॉ. निशा ओव्हाळ, सरचिटणीसपदी सुनील जोशी, सहसरचिटणीसपदी आम्रपाली गायकवाड, खजिनदारपदी सदानंद गायकवाड , सहखजिनदारपदी जोती सकपाळ मॅडम, सल्लागारपदी ॲड. श्रीधर कवडे व विनायक नगावरे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुयोग गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य तुकाराम खंडागळे, गणेश कांबळे (जासई), प्रकाश कांबळे (जासई), कांचन ओव्हाळ, मनोज ओव्हाळ, प्रमोद कांबळे, संतोष मोघे, शांताबाई परुळेकर, अर्चना परुळेकर, नवनीत कांबळे, आदित्य मर्चंडे, दीपक साळुंके, अरुण ओव्हाळ, ऋषिकेश कासारे, सिद्धार्थ कांबळे, सुरेंद्र नवधरे, आदित्य गायकवाड, मंगेश कांबळे, विशाल कवडे, विनायक नानावले, लखन गायकवाड, प्रकाश शरणागत, प्रकाश गायकवाड, सचिन धुळे, संतोष गायकवाड, दिपक साबळे, समर्थ कांबळे, महेश, निखिल, समीर गायकवाड, आदी सदस्य उपस्थित होते.
उरण तालुक्यातील स्थानिक बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच तालुका स्तरीय बुद्ध विहार उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा