उरण दि २७(विठ्ठल ममताबादे )आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांचे अनोखे दातृत्व सर्वपरिचित आहे. दुसऱ्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे. ज्यांनी केवळ विमान हा शब्द ऐकला आहे, अशा अनेकांना त्यांनी आजपर्यंत विमान प्रवास घडवला आहे. महेंद्रशेठ घरत यांच्या मोठ्या मनाच्या दिलदारपणामुळेच हायस्कूल आणि महाविद्यालयीन जीवनात लाभलेल्या सवंगड्यांसह त्यांनी चक्क ३५ जणांना १७ ते २५ ऑगस्ट असे आठ दिवस नितांतसुंदर अशा व्हिएतनामचे पर्यटन घडवले. परदेश प्रवास स्वप्नातही न पाहिलेल्यांना महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनामची सफर घडवली. त्यांचे परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे चाकोरीबद्ध आयुष्य जगलेल्या सवंगड्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
ज्यांनी पासपोर्ट शब्द ऐकला होता, पण पासपोर्ट काढला नव्हता, त्यांनीही आठ दिवसांच्या पर्यटनात व्हिएतनामची राजधानी हनोई, त्यानंतर दा नांग, बाणा हिल, फु कॉक, हो ची मिन्ह शहर आणि मुंबई असा पाच वेळा विमान प्रवास केला आणि फाईव्हस्टार आणि थ्री स्टार हॉटेलमध्ये व्हिएतनाममध्ये राहाण्याची संधी दिली. त्यामुळे अशा सहकाऱ्यांना आकाश ठेंगणे झाले होते. क्रूझ सफर, तेथे जागोजागी असणारी बेटे, बाणा हिल येथे केबल कारमधून प्रवास आणि ते विहंगम दृश्य, दोन्ही हातावर साकारलेला पूल, तेथील उंचच उंच डोंगर रांगांतून जाणारी केबल कार, अनेक बेटांना जोडणारी जगातील सर्वाधिक लांबीची केबल कार, दा ची मिन्ह हे सुसज्ज शहर आणि व्हिएतनाम-अमेरिकादरम्यानच्या युद्धाची अंगावर काटा आणणारी दृश्य असणारे संग्रहालय आदींचे दर्शन एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना महेंद्रशेठ घरत यांनी घडवले. त्यामुळे एम. जी. ग्रुपचे सहकारी भारावले आहेत.
यावेळी एम. जी. ग्रुपच्या सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या. महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही पहिल्यांदा विमानात बसलो. एवढेच नव्हे तर परदेशात जाऊ शकलो. त्यांनी प्रवासात जो आनंद दिला त्याला तोड नाही. त्यांनी स्वतःपेक्षा आमचीच काळजी व्हिएतनाम प्रवासात घेतली. उत्तम नियोजन आणि शिस्तप्रिय व्यवस्थापनाने प्रवासाचा आनंद द्विगुणित केला, अशा भावना पहिल्यांदाच परदेश प्रवास केलेल्या सवगंड्यांनी व्यक्त केल्या. परदेशात ३५ जणांना सांभाळणे आणि सांभाळून घेणे सोपे काम नव्हते, पण महेंद्रशेठ घरत यांनी ते लीलया पार पाडले. विशेष म्हणजे व्हिएतनाम पर्यटनासाठी असलेल्या सहकाऱ्यांच्या काही नातेवाईकांचे निधन झाले, काहींच्या घरी अडीअडचणी निर्माण झाल्या. कुणी गंभीर आजारी पडले, मात्र व्हिएतनाम प्रवासात महेंद्रशेठ घरत यांनी ज्यांच्या कुटुंबात दुःखद घटना घडली आहे, त्यांना मोलाचा आधार दिला. श्रद्धांजली वाहिली. तसेच गंभीर आजारी असणाऱ्यांवर व्यवस्थित आणि वेळेवर उपचार होतील, याची काळजी महेंद्रशेठ घरत यांनी व्हिएतनाममधूनही घेतली. त्यामुळे मोठ्या मनाचा, दिलदार आणि दुसऱ्याला आनंद देण्याची वृत्ती, समोरच्याच्या चेहऱ्यावरील भावना वाचणारे महेंद्रशेठ घरत, हे सद्यपरिस्थितीत एकमेव नेते असल्याच्या भावनाही व्हिएतनाम पर्यटनातील सवंगड्यांनी व्यक्त केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा