आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

जनता विद्या मंदिर- कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

प्रतिनिधी : आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे आज आपल्या देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रांगोळी प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये माध्यमिक शाळेतील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन करून झाली.संविधान उद्देशीकेचे वाचन झाल्यानंतर ध्वजपूजन व प्रतिमापूजन संस्थेचे अध्यक्ष व जनता विद्या मंदिरचे ज्येष्ठ लिपिक श्री.शाम बापू वाघमारे सर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर ध्वजारोहन संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. तुकाराम नामदेवराव काळे यांच्या हस्ते झाले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीताचे गायन करण्यात आले.
       इयत्ता 10 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. श्री. भीमाशंकर हरी सहाणे यांच्या हस्ते करण्यात आला. स्कॉलरशिप आणि NMMS परीक्षेत प्रवीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.घोडेगाव आणि काळेवाडी दरेकरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. गांधी फार्माचे श्री. संतोष गांधी यांनी संस्थेला इंटरक्टिव्ह पॅनल साठी 125000/- ची देणगी दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, कॉपी मुक्ती अभियान, साक्षरता आणि तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय कदम सर, सूत्रसंचालन श्री. पाचपुते सर आणि श्री. आवटे सर यांनी केले. समारोहासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार उपप्राचार्य श्री. पातकर सर यांनी मानले.
घोडेगाव आणि काळेवाडी - दरेकरवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...