आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

अमन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध; पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड

विक्रोळी (प्रतिनिधी)-विक्रोळी टागोरनगर येथील अमन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता, एकोपा आणि विकासाला प्राधान्य देत सर्व सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने निवडणूक प्रक्रिया कोणत्याही वादाविना सुरळीत पार पडली.
     संस्थेच्या अध्यक्षपदी मोहम्मद हुसेन मोहम्मद उस्मान शेख, सचिवपदी आजम इक्तेदार खान तर खजिनदारपदी परवेज हुसेन अब्दुल सत्तार खामकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संचालकपदी अमीर अब्दुल सत्तार शेख आणि मोहम्मद इसरार कुरेशी यांची निवड झाली. संचालिका पदासाठी नफीसा साजिद शेख आणि पाकीझा मोहम्मद शेख यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
     निवडणूक प्रक्रियेदरम्यान सोसायटीच्या सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित नव्या कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या दैनंदिन कामकाजासोबतच सभासदांच्या समस्या, सोसायटीची देखभाल, आवश्यक नागरी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि भविष्यातील विकासकामे यांना प्राधान्य देण्याची अपेक्षा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
      या निवडणुकीचे संपूर्ण कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी पाहिले. निवडणूक प्रक्रिया नियमानुसार आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी त्यांनी आवश्यक कार्यवाही केली. बिनविरोध निवड झाल्याने सोसायटीतील सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच संचालक आणि संचालिकांचे विविध सामाजिक, सहकारी व स्थानिक स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीच्या सवलती द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी; पुरस्कारप्राप्त कामगारांवरील अन्याय दूर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या ...