चांदिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५७, संघर्षनगर, संकुल क्रमांक ११ येथे शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाजकल्याण केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन भाऊ अहिर यांच्या शुभहस्ते या समाजकल्याण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विभागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या समाजकल्याण केंद्राची सुरुवात होत असल्याबद्दल आमदार दिलीप लांडे यांनी आनंद व्यक्त केला.
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या विचारांना पुढे नेत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. संघर्षनगरमध्ये समाजकल्याण केंद्र सुरू झाल्याने समाज बांधवांसाठी एक उपयुक्त आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे,” असे आमदार दिलीप लांडे यांनी यावेळी सांगितले.या केंद्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रम राबविण्यास मदत होणार असून, समाज बांधवांना एकत्र येण्यासाठी आणि विविध उपक्रमांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला समाज बांधवांसह शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे, महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मोरे, वैशाली सूर्यवंशी, महिला उपविभाग प्रमुख प्रभावती पालव, श्वेता मसूरकर, राजेंद्र पाटील, युवासेना विभाग अध्यक्ष क्रांती राणे, शाखाप्रमुख अजय कांबळे, सुशील जाधव, शिवा सूर्यवंशी, मंगेश सकपाळ, राजू फडतरे, शैलेश निंबाळकर, नितीन गोखले, महेश पाणीग्राही आदिसह मातंग समाजाचे नामदेव साठे, सक्रिय सदस्य मिलिंद आदिसह शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा