पनवेल : ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टी.एम.जी.क्रिएशन आयोजित देशभक्तीपर गीतांचा ' मेरी जान तिरंगा है हमारा' हा बहारदार कार्यक्रम व सन्मान सोहळा रोटरी कम्युनिटी हॉल, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील हिंदी व मराठी चित्रपटामधील राष्ट्रभक्तीपर गीते ७ते७०वर्षे वयोगटातील गायकांनी सादर केली.सदरहु संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना एन.डी.खान यांची होती.
अँड सुरेखा भुजबळ, अशोक डिका, डॉ. विजय मोरे,विद्या डोंबे, सुनिल दळवी,मिलिंद जाधव, सुरेश लहुळकर, राजकुमार सावंत, श्वेताम्बरा करबाटे,,दीपक कदम, अनिल शिशुपाल, सुनीता भुजबळ, कु.अर्णव झोडगे, कुमारी पार्थी घरत, कुमारी सावनी पाटील, मिलिंद पराटे, इत्यादी गायकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गाऊन श्रोत्यांचे कान तृप्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक एन.डी.खान यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी नेहमीच्या सफाईने केले.प्रसंगानुरूप दर्जेदार काव्यपंक्ती त्यांनी सादर केल्या.
कॅप्टन मनोज भांबरे, ॲड.जीविता पाटील, विलास खानोलकर ,सि.के.टी चे डॉ . राजेश येवले, प्रल्हाद तळेले,.हाजी शाहनवाज खान,अभिनेत्री उर्मिला डांगे, सिने कलाकार सुरज कांबळे, अनुप बहाड , सौरभ पवार,साहित्यिक ऋता भांबरे, विजय भोसले, भगवान बडगुजर, रोशन शेख , शैलेंद्र अक्कलकोटे , वनिता कोळी आणि छाया अक्कलकोटे
इत्यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात पनवेल परिसरातील २५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी नाजनिन पालेकर, रेश्मा मुलये, पूनम गुप्ता, मंजूषा कदम,सुधा वाटवे, मनिषा वाटवे गीता देवरीया हे आपल्या शालेय शिक्षकां सोशल उपस्थित होते.
कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्व गायकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.सलमा खान , डॉ .विजय मोरे श्री.राजकुमार ताकमोगे सौ.मीना ताकमोगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा