आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळ व ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्था आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद ; रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी

मुंबई (स्मिता सं. गोंधळी )-कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळ व ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सेंट झेवियर स्ट्रीट परळ मुंबई येथील कुणबी ज्ञातीगृह वाघे हॉल येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिराला समाज बांधव तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अनेक रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 
   कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुणबी महिला मंडळ मुंबईच्या अध्यक्षा सौ.दीपिका आग्रे,सरचिटणी सौ. प्रतीक्षा निवाते, खजिनदार कु.निलाक्षी लोंढे,उपाध्यक्ष सौ.स्मिता गोंधळी,सौ.सुहासिनी गोनबरे,सौ.दिपीका मौले व महिला मंडळ कार्यकारणीतील सदस्या व कार्यकर्त्यां मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.तसेच मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.ऋषिकेश सेवाभावी संस्थेच्या संस्थापक सौ.वैशाली जोशी, अध्यक्ष श्री.धर्मेश पाटणे,सचिव श्री.विश्वनाथन राजपुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्यावतीने कुणबी महिला मंडळाच्या व ऋषिकेश जोशी सेवाभावी संस्था यांच्यावतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम, नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी

प्रथम विजेता संघ नवी मुंबई : अन्वय व्यसनमुवती केंद्र आणि नशाबंदी मंडळ - महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासा...