आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद

गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला भेट देत अनोख्या पद्धतीने ईदचा सण साजरा केला.
      या उपक्रमाच्या माध्यमातून आश्रमातील मुलांना ‘सर्व धर्म समभाव’ ही शिकवण देण्यात आली. तसेच ईद हा सण का साजरा केला जातो आणि या दिवशी कोणत्या परंपरा व प्रथा पाळल्या जातात, याबाबत मुलांना माहिती देण्यात आली.
      यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वैशाली गुरव, हसनैन झटाम, महेक झटाम तसेच अंकुर आश्रमाचे कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर उपस्थित होते. अलेक्झांडर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
    आश्रमातील मुलांच्या विविध कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा यासाठी मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी यावेळी दिली.
      दरम्यान, आश्रमातील मुला-मुलींनी विविध कौशल्ये व कलागुण शिकण्याची इच्छा व्यक्त करत त्याबाबत मुस्कान झटाम यांच्याकडे मागणी केली. या उपक्रमामुळे मुलांमध्ये एकात्मता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना रुजण्यास मदत झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद

गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला ...