सन्मा सलीम भाई आणि माझी ओळख होऊन जवळपास २५ वर्षा पूर्वी झाली.मी त्यावेळी बॅचलर होतो.जोगेश्वरी वेस्ट येथे माल्कम बाग या पारशी कॉलनीत आमच्या सेवानिवृत्त शिक्षका फ्रेनी मदन यांच्या मोठ्या घरात ग्रुप ट्युशन घेत असे.त्यावेळी पैसे देखील चांगले मिळायचे.आठवड्यातून तीन दिवस साधारण दोन तास दहा मुलांना मराठी हिंदी शिकवायचो. पारशी मुलांना मराठी हिंदी प्रॉपर येत नसे.त्यामुळे त्यांना मराठी हिंदी शिकविणारे शिक्षक लागतच असायचे.महिन्याला साधारण १५ ते २० हजार मिळायचे..कालांतराने माझा विवाह झाला आणि नंतर आमच्या गार्गी जन्मानंतर ग्रुप ट्युशन घेणे बंद केलं.
सलीम यांचे धड्याळ दुरुस्तीचे दुकान माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर होते आणि आजही आहे.काही कामानिमित त्यावेळी झालेली मैत्री आजही कायम असून अधूनमधून कामानिमित्त तर कधीतरी खास भेटण्यासाठी गप्पागोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे जाणे होते. आज जोगेश्वरी स्टेशन येथे काही कामानिमित्त गेलो होतो तर सलीम भाई यांच्याकडे खास त्यांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो.मला पाहून त्यांना आनंद झाला.साधारण अर्धा तास तिकडे होतो..अनेक विषयांवर चर्चा झाली.सलीम भाई यांना देखील अन्यायाविरुद्ध चीड येते.अनेकदा ते मला फोन करून काही घटनांबद्दल बोलतात.व्हिडिओ पाठवतात.निघताना त्यांनी मला ऊसाचा रस पाजला आणि गणेश सर मिलते रहेंगे असे सांगायला देखील ते विसरले नाहीत. एकत्र फोटो काढला आणि त्यांची रजा घेऊन निघालो. दैनंदिन जगताना दररोज एखाद्या चांगल्या व्यक्तीशी सल्ला मसलत होणे गरजेचे आहे.
-गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा