आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

जुचंद्र सेवा मंडळातर्फे बालयोगी सदानंद महाराजांचा ६८ वा जन्मोत्सव संस्काराच्या मार्गदर्शनाने साजरा

संत महात्म्यांनी समाजाला दिलेले विचार आणि शिकवण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावी : ह.भ.प.श्री. नरेश सातपुते महाराज, शहापूर 
प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासामध्ये संस्काराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संत महात्म्यांनी समाजाला दिलेले विचार आणि शिकवण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावी केवळ विचार ऐकणे नव्हे तर त्यांचे अनुकरण करणे महत्त्वाचे आहे, असे भावनिक उद्गार ह.भ.प. नरेश महाराज सातपुते यांनी विद्यार्थ्यांसमोर काढले. 
जुचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या ६८ व्या जन्मोत्सवानिमित्त जूचंद्र येथील एस.पी. जुनिअर कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील १००० विद्यार्थ्यांना जीवनात संस्काराचे महत्त्व या विषयावर व्याख्यान देण्यासाठी शहापूर तालुक्यातील शांताराम चौधरी गुरुजी, माध्यमिक विद्यालय शिंदपाडा मुख्यध्यापक, ह. भ. प. नरेश महाराज सातपुते उपस्थित होते. कार्यक्रमास ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज, जूचंद्र सेवा मंडळाचे संस्थापक पुरुषोत्तम पाटील, मेघनाथ पाटील, विद्याधर म्हात्रे, विद्याधर भोईर, मिलिंद पाटील, उद्योजक जयराम पाटील, ज्युनिअर कॉलेज व विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. 
      मंडळाचे अध्यक्ष किरण म्हात्रे यांनी मंडळाचे कार्य व कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविक भाषणात नमूद केला. बालयोगी सदानंद महाराज यांचा जीवन परिचय ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज म्हात्रे यांनी कळवून दिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातपुते महाराज म्हणाले की नेहमी सकारात्मक विचार करून वाईट गोष्टींचा त्याग करा व चांगले विचार आत्मसात करा, चांगले संस्कार माणसाला योग्य दिशा देतात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करतात, आपले दैवत आई वडील तसेच गुरुजन यांचा सन्मान करा, असा उपदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. बाबांच्या वाढदिवसानिमित्त मैत्री फाऊंडेशनचे विश्वस्त मुकेशभाई त्रिवेदी व पियुष पटेल हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व सह्याद्री इंग्रजी शाळेतील २००० विद्यार्थ्यांना लाडू, बिस्किट, कॅडबरी, पेन इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयुरी गावडे मॅडम यांनी केले. मैत्री फाऊंडेशनचे उद्योजक राजेशभाई त्रिवेदी यांचे मंडळाने आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जुचंद्र सेवा मंडळातर्फे बालयोगी सदानंद महाराजांचा ६८ वा जन्मोत्सव संस्काराच्या मार्गदर्शनाने साजरा

संत महात्म्यांनी समाजाला दिलेले विचार आणि शिकवण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आचरणात आणावी : ह.भ.प.श्री. नरेश सातपुते महाराज, शहापूर  ...