आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

वैष्णव शिंपी समाजाच्या वतीने घाटकोपर येथे नामदेव महाराजांना अभिवादन

प्रतिनिधी : वैष्णव शिंपी समाज मंडळ मुंबई, ठाणे, कल्याण तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा घाटकोपर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात संत नामदेव महाराजांची दिंडी काढण्यात आली नंतर पूजा आणि आरती करण्यात आली प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे माजी अध्यक्ष श्री. बाबाराव गंगाधरराव हुडकर यांना बोलवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. दिवाकर बापूराव जाधव यांना देण्यात आले प्रमुख अतिथी महामंत्री श्री. शेखरजी तावडे उपस्थित होते.त्यानंतर मान्यवराच्या हस्ते समाज बांधवांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. सर्वांचे लाडके ज्येष्ठ समाजसेवक कै. बबनराव गणपतराव जोध यांना समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.व 65 वर्षावरील समाज बांधवांना जेष्ठ नागरिक पुरस्कार देण्यात आला. दहावी व बारावी विद्यार्थ्यांना गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश वासुदेव शेळके यांनी उत्तमरीत्या पार पाडले. समाजाचे मंडळाचे विश्वस्त श्री. सुरेशराव महानकर, अध्यक्ष श्री.प्रभाकर न.नानोटे,सचिव श्री. मुकुंद जनार्दन माळोदे, खजिनदार श्री.महेंद्र वा. राऊत, कार्याध्यक्ष श्री.गणेश शेळके, उपाध्यक्ष श्री.
उमेश निराळे, तसेच प्रचारप्रमुख श्री. अजय चिखलकर,महिला अध्यक्ष सौ. माधवी गणेश शेळके महिला सचिव सौ. स्वाती अजय चिखलकर, महिला उपाध्यक्ष सौ. संगीताताई महानकर आणि सर्व महिला मंडळ आणि सर्व सभासद यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

घणसोली येथील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (रजि )घणसोली व ओम साई मॉर्निंग ग्रुप तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणचा राष्ट्रीय कार्यक्रम उत्साहात साजरा!!

घणसोली (विशेष प्रतिनिधी) : शनिवारी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, घणसोलीच्या वतीने...