आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

घणसोली येथील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (रजि )घणसोली व ओम साई मॉर्निंग ग्रुप तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणचा राष्ट्रीय कार्यक्रम उत्साहात साजरा!!

घणसोली (विशेष प्रतिनिधी) : शनिवारी 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, घणसोलीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अण्णासाहेब पाटील उद्यान सेक्टर 4 घणसोली येथे झेंडावंदन  आणि सत्यनारायणाची पूजा हे दोन्ही कार्यक्रम सकाळी 7.30 वाजता पार पडले . सदर कार्यक्रमास 100 ते 125 स्त्री/ पुरुष नागरिक हजर होते. तसेच मा समाज सेवक श्री कृष्णा पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 
       सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला व पुरुष सभासदांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयी प्रथम व द्वितीय क्रमांक स्पर्धकांना मा. कृष्णा पाटील यांच्या शुभहस्ते योग्य ते बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला. 
      आजच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 च्या दरम्यान एस टी सवलत कार्ड (NCMC Card )काढण्याचे शिबीर भरवण्यात आले. सदर शिबीरचा लाभ घेऊन 105 स्री पुरुष ज्येष्ठ नागरिक व महिलाना एसटी प्रवास सवलतीचे एनसीएमसी कार्ड ची नोंदणी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड, सचिव श्री महादेव शिंदे आणि खजिनदार दत्तात्रय दैवज्ञ उपाध्यक्ष श्री प्रमोद गायकवाड, उप सचिव रमेश मराठे, उपखजिनदार श्री रमेश रणपिसे तसेच इतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस...