आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस्ट  रोजी दुपारी ४.०० वा. सहयोग मंदिर हॉल, दुसरा मजला, सहयोग मंदिर मार्ग, घंटाळी, नौपाडा, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
     या समारंभात मार्च/एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या व उच्च विद्याविभूषित आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रांमध्ये वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार डॉ. श्री. संजीव गणेश नाईक तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. सुहास सिताराम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या गुणगौरव समारंभास सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन अध्यक्ष डॉ. श्री. किरण राम गावंड व प्रमुख कार्यवाह श्री. रमेश सिताराम गवळी यांच्यासह आगरी समाज मंडळ,ठाणे परिसर यांच्या मार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२१२५७७१५ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे गुणगौरव समारंभाचे आयोजन

ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाज मंडळ, ठाणे परिसर या संस्थेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही "गुणगौरव समारंभ" कार्यक्रम रविवार दि. १६ ऑगस...