आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना, लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर येथे 'प्रोजेक्ट विद्या 2' हा गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

मुंबई(शांताराम गुडेकर )   शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन च्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवतावादी दिना निमित्त रोचिराम टी. थडानी हायस्कूल फॉर हियरिंग हॅन्डिकॅप्ड, कलेक्टर कॉलनी, चेंबूर कॅम्प, येथे 'प्रोजेक्ट विद्या २' हा गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या घेण्यात आला. हा उपक्रम शिक्षणाला पाठबळ देण्यावर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने त्यांची शिकण्याची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर केंद्रित होता.शिक्षण,आरोग्य आणि समाजकल्याणा साठी शिवसेना प्रणीत राष्ट्रीय शिव स्वराज्या सेना आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन नेहमीच अग्रेसर राहील असा विश्वास विद्यमान शिवसेना आमदार सन्मा.तुकाराम काते साहेब यांनी व्यक्त केला  
                सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवस्वराज सेनेचे व लायन्स क्लब ऑफ सॅफ्रन चे अध्यक्ष लायन जितेंद्र सकपाळ,क्लबचे सचिव लायन संजू ससमल, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर भाग्यश्री वर्तक यांच्या नेतृत्वाखाली व लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉनच्या पदाधिकाऱ्यांनी केले त्याप्रसंगी फर्स्ट व्हॉइस डिस्टिक गव्हर्नर लायन सायरस सुरती, फास्ट डिस्टिक गव्हर्नर प्रदीप पारेख, लायन्स क्लब ऑफ सॅफ्रन चे एक्स्टेशन चेअरमन लायन विजय रायमाने,डिस्ट्रिक्ट 3231 A2 च्या लायन पद्मा राममूर्ती,शाळेचे ट्रस्टी श्री.पपन सहेजा,मुख्याधपिका वनिता धुरी,म्युनिसिपल शाळेच्या मुख्याधपिका सुमन पाटील,शिवसेना राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेच्या राज्य प्रवक्त्या सौ.सुषमा सकपाळ राऊत, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.सुखदेव सस्ते, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष स्मिता देवकर पाटील,जुईनगर सचिव श्री.धनाजी जगताप,सफ्रॉन क्लब चे सदस्य लायन हबीब अन्सारी,लायन वीणा दोनवलकर व शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी, शिक्षकवृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अभिमान कि अपमानाची गोष्ट! सुविधांचा अभाव... पालघर जिल्ह्यात आजही रुग्णाला झोळीत न्यावे लागते !!

मुबंई (सतिश पाटील): विकसित भारत, विश्वगुरु, जगात एक नंबर,नविन अधुनिक भारत फक्त भाषणातच प्रत्येक्षात जैसे थे,,, मुंबई पासून दोन त...