आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

अभिमान कि अपमानाची गोष्ट! सुविधांचा अभाव... पालघर जिल्ह्यात आजही रुग्णाला झोळीत न्यावे लागते !!

मुबंई (सतिश पाटील): विकसित भारत, विश्वगुरु, जगात एक नंबर,नविन अधुनिक भारत फक्त भाषणातच प्रत्येक्षात जैसे थे,,,
मुंबई पासून दोन तासाच्या अंतरावर वाडा जव्हार पालघर जिल्हा 75 किमी अंतरआहे. आणि तरीही आज हा भाग सुगसोई पासून वंचित आहे. हि पहीली घटना नाही तर पाणी, पुल, रस्ते, शिक्षण,वैद्यकीय सेवा अशा अनेक सेवेपासून वंचित आहे. याच भागातील तारपा वादक यांना भारत सरकार राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री भिकल्या भिंडा यांचा वाजत गाजत सन्मान केला. पण दुर्दैव त्याच व्यक्तीच्या गावात सुविधा पासून वंचित आहे पण सरकारचं लक्ष नाही.
जव्हार वाडा खडकी पाडा ८० वर्षानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही सुविधांचा अभाव पाई पेशन्ट ला न्यावे लागते झोळीत दवाखान्यात नेणारा विडीओ व्हायरल पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा परिसरातील खडकीपाडा येथे रस्ता आणि पुलाच्या अभावामुळे एका रुग्णाला झोळीत घालून उपचारासाठी नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
          स्वातंत्र्याची ८० वर्षे लोटल्यानंतरही आदिवासी भागात मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.घटनेची पार्श्वभूमी आणि कारणेरस्ते व पुलाचा अभाव: पालघरमधील जव्हार तालुक्यातील खडकीपाडा गावाला जोडणारा पक्का रस्ता तसेच नदीवर पूल नाही.झोळीतून वाहतूक: रस्ता नसल्याने रुग्ण किंवा गर्भवती महिलांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावकऱ्यांना तासनतास झोळीचा आधार घ्यावा लागतो.प्रशासनिक अनास्था: स्थानिकांनी अनेकदा मागणी करूनही पुलाचे आणि रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण झालेले नाही, ज्यामुळे ग्रामस्थांना नजीकच्या दवाखान्यात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अभिमान कि अपमानाची गोष्ट! सुविधांचा अभाव... पालघर जिल्ह्यात आजही रुग्णाला झोळीत न्यावे लागते !!

मुबंई (सतिश पाटील): विकसित भारत, विश्वगुरु, जगात एक नंबर,नविन अधुनिक भारत फक्त भाषणातच प्रत्येक्षात जैसे थे,,, मुंबई पासून दोन त...