आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ जुलै, २०२६

आम्ही कोकणकर कलामंचचा कोकण सोहळा सन्मान संपन्न ;कोकणातील ११ रत्नांना कोकण सन्मान देऊन केले सन्मानित

मुंबई (शांताराम गुडेकर ) आम्ही कोकणकर कलामंचच्या " कोकण सोहळा "सन्मान सोहळ्यात रविवार दि.१२ जुलै रोजी दादर येथे छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे कोकणातील ११ रत्नांना कोकण सन्मान देऊन सन्मान केला.सातत्याने समाजाची प्रेरणा घेऊन आणि कोकण हेच ध्येय, कोकणातली मातीला देखील सोन्याचा भाव मिळावा आणि कस्तुरीचा सुगंध यावा अशा ध्येय उद्दिष्टांना घेऊन आज पर्यंत चालत असलेल्या "आम्ही कोकणकर कलामंचाचा" प्रवास म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये निस्वार्थीपणे समर्पित होणे. दर वर्षी समाजसेवा करताना प्रामुख्याने अनाथ वृद्धश्रमाला भेट देऊन, अनाथ मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत आनंद व्यक्त करून भोजन समारंभ आयोजन करणे. म्हणजे दुःखी जीवनातील क्षणभर सुखाची फुंकर घालणारे हे "आम्ही कोकणकर कलामंच", कार्य आणि छत्रपती शिवरायांचा वारसा चालवत असताना गड संवर्धन कार्यात देखील यांचा सर्वात मोठा हात आहे. आणि सातत्याने कलाकारांचं संगोपन कलाकारांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्यांची कला सादर करण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यामध्ये बहुरंगी नमन, नाटक, लघुपट आयोजन करून शंभर पेक्षा जास्त कलाकारांचा ताफा असलेला हा एकमेव कलामंच आहे. या कला मंचामध्ये पहिल्यांदा एकही पुरुष न घेता केवळ स्त्रियांचे बहुरंगी नमन सादर करणारे एकमेव कलामंच देखील नाव रुपाला आले आहे. तर केवळ दोन वर्षांमध्ये अकरा उपक्रम राबवून आपलं नाव अतिशय सुवर्णक्षणांनी लिहिलं गेलं आणि या साठी संपूर्ण "आम्ही कोकणकर कलामंचाचे" संस्थापक, दिग्दर्शक श्री. कृष्णा येद्रे यांची अतिशय मेहनत घेऊन हे विश्व उभे केले. ते आज सर्वाना पाहायला मिळाले. म्हणून या कोकणरत्न सन्मान सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथीने मोठ मोठ्या कलाकारांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली यामध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा अभिनेत्री शिवाली परब, प्रसार माध्यमा बिनधास्त मुलगी गौरी पवार, उद्योजक श्री. अभिजीत निंबरे, शैक्षणिक क्षेत्र श्री. लोकेश राज्याध्यक्ष, वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर श्री. नागराज तेंडुलकर, सांस्कृतिक क्षेत्र शाहीर श्री. तुषार पंदेरे, शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन, सामाजिक क्षेत्र जल फाउंडेशन कोकण विभाग, सांस्कृतिक क्षेत्र श्रीदेवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, पत्रकारिता क्षेत्र श्री पत्रकार दीपक मांडवकर, गड संवर्धन क्षेत्र दुर्गवीर प्रतिष्ठान उद्योजग खातू मसाले, उद्योजग पितांबरी, ज्वेलर्स मालक श्री.अनंत फिलसे, कोकणचा साज संगमेश्वरी बाज उत्कृष्ट कलाकार अभितेने श्री.सचिन काळे व राजकीय नेतृत्व, समाजसेवक आणि सहयोगी संघटना या सर्वांनी प्रामुख्याने उपस्थित दिली. व यांचा देखील सन्मान करण्यात आला.
               प्रामुख्याने दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात या सन्मान सोहळा संपन्न होताना "आम्ही कोकणकर कलामंचाचे" वर्षभरातील अकरा उपक्रमाची यशोगाथा प्रस्तावना सादर करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाच्या सुरुवातीला रंगमंचाच्या समोर रसिक प्रेक्षकाच्या मधून छत्रपती शिवराय बळीराजा, परशुराम, संत महात्म्यांची लेझीमने नाचवत दिंडी रंगमंचावर पोहचली हेच कार्यक्रमाचं सर्वात मोठा आकर्षण ठरले. त्याच पद्धतीने प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्राची हास्यता अभिनेत्री शिवली परब यांनी बोलून दाखवलं की कोकण म्हणजे आपला प्राण आहे. कोकणाला जेवढे जपाल तेवढेच आपले अस्तित्व टिकेल असे देखील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. त्यानंतर संस्थापक कृष्णा यद्रे यांनी आतापर्यंत केलेल्या कष्टाचे मोल म्हणून प्रत्येक मान्यवरांनी स्तुती सुमने अर्पण केली व सर्वत्र कौतुक होत आहे. आणि भविष्यात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत असं देखील संबोधित करण्यात आले. या कलामंचाच्या प्रत्येक कलाकाराचा देखील सन्मान करण्यात आला. यानंतर आमचं कोकण या कोकण संस्कृतीला जपणारे एक नाटक सादर करण्यात आले हे देखील या कार्यक्रमाचे आकर्षण हरले. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पत्रकार खेरटकर यांनी केलं.कार्यक्रमाला सप्तरंग भरले. यांच्या सूत्रसंचालनाने प्रत्येक रसिका प्रेक्षक मोहित होत होता. टाळ्यांचा प्रतिसाद देत होता. हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य झाला असून प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. आणि भविष्यात असे कार्यक्रम राबवून आपल्या कोकणी माणसाला मानसन्मान मिळेल असे सर्वांना वाटले. व अशी अशा प्रत्येकाने व्यक्त केली. आणि कलाकार आणि मान्यवर यांच्या हस्ते सर्वांचे आभार मानून संस्थापक श्री. कृष्णा येद्रे सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...