आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ जुलै, २०२६

शिवसेना शिवडी विधानसभा व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने के.ई.एम.रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ.हरीश पाठक यांच्या नियुक्तीबद्दल पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार!

मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवसेना शिवडी विधानसभा व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने बृहन्मुंबई महापालिकेचे गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के.ई.एम. रुग्णालय परळ येथे रुग्णालयाचे नवनियुक्त अधिष्ठाता डॉ.हरीश पाठक यांना भेटून रुग्णालयातील त्यांच्या नेमणुकी बद्दल पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन रुग्णांच्या अडी- अडचणींबद्दल थोडक्यात चर्चा करण्यात आली.यावेळी महिला विभाग प्रमुख रेश्मा सकपाळ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ,शिवडी विधानसभा प्रमुख कुणाल प्रभुणे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विधानसभा प्रमुख गायत्री आंब्रे,,महिला विधानसभा प्रमुख आकांक्षा गावडे,उपविभाग प्रमुख प्रफुल अहिरे, शाखाप्रमुख (२०३), मुकेश महाडिक, शाखाप्रमुख (२०५),संजय गोसावी,महिला शाखाप्रमुख २०२ च्या ऋतुजा खामकर, २०३ च्या मनीषा रानवडे,२०४ च्या स्नेहा शिर्के, २०५ च्या दर्शना पवार,२०६ च्या राणी जेनापल्ली व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...