आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ जुलै, २०२६

पेण मध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना ; पाटणेश्वर आदिवासी वाडी मध्ये पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

गडब (अवंतिका म्हात्रे ): पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात समोर आली आहे. पाटणेश्वर येथील आदिवासी वाडीत पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या प्रकरणात अत्याचारानंतर खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पेण पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत तपास वेगाने सुरू केला आहे. 
      पेण तालुक्यातील पाटणेश्वर परिसरातील आदिवासी वाडीत पाच वर्षीय मुलीचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पेण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांचे शोधपथक व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वस्तीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला.
     रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल व उपअधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. 
     मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होईल अशी माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...