पेण (पी.डी. पाटील): अवंत्रिका गृहउदयोग व साप्ताहिक रायगडची शान कार्यालयाच उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . सदर उद्घाटन मन्नत मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा मुस्कान रफिक सटाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पत्रकार आणि उद्योजिका अवंतिका म्हात्रे यांनी सविस्तर माहिती दिली. माहिती देताना म्हणाल्या की अवंतिका गृह उद्योग घरगुती व्यवसायाचे आघाडीचे मशीन उत्पादक आहेत. महाराष्ट्रातील उत्पादन कंपनी म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचे ठरविले आहे. आम्ही नावीन्यपूर्ण घरगुती व्यवसाय यामध्ये विशेषतज्ञ आहोत. महिलांची घरातून काम करण्याची मागणी लक्षात घेता या व्यवसाय निर्मितीची सुरुवात करीत आहोत.व्यक्तीने यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी जीवन बदलण्यासाठी आणि आर्थिक वाढीमध्ये योगदान देण्यासाठी सत्संग करण्यासाठी डिझाईन केलेले हे उत्पादक समईवात माशीन आहे आणि लॉंग कॉटन विक मशीन राऊंड कॉटनिक मशीन आणि धूम मेकिंग मशीन सारख्या उच्च दर्जाच्या मशीन आम्ही महिला सक्षमिकरणासाठी ऑफर करीत आहोत. प्रत्येक मशीनची कामगिरीची निश्चित करण्यासाठी अचूकतेने तयार केलेली आहे. ज्यामुळे ती तुमच्या घरगुती व्यवसायाच्या गरजांसाठी आदर्श बनत आहे .उत्पादन क्षेत्रात दोन दशकाहूनअधिक अनुभव गुणवत्ता आणि अनुभव पुरविणारी तज्ञांची टीम आहे . सध्या महिला घरबसल्या व्यवसायाला मागणी करत असल्याने त्या दृष्टीकोनातून या व्यवसायाची सुरुवात आम्ही करित आहोत.
त्याचप्रमाणे साप्ताहिक रायगडची शानच्या संपादक अवंतिका सुरेश म्हात्रे यांनी त्यांचे मिस्टर कै सुरेश म्हात्रे निर्भिड संपादक तसेच पत्रकार म्हणून त्यांची असलेली समाजातील छाप लक्षात घेता त्यांच्या स्वप्नाना नवी उभारी देण्याच काम आता त्यांच्या पत्नी श्रीमती अवंतिका म्हात्रे या करीत आहेत. त्यांच्या या लेखनीला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
सदर कार्यक्रमाला मुख्य हातभार राहूल कौष्टी सर रफीक झटाम, अन्वी एक्वाचे मालक अमोल पाटील,अजय पाटील, वैशाली गुरव,अरुणा पाटील, विकास पाटील, बंटी, सागर यांचा हातभार लागला.
या कार्यक्रमाप्रसंगी कमलाकर बताले, सुरेश पाटील, वसंत म्हात्रे, नितिन पाटील, जयश्री पाटील, मिनाक्षी पाटील, अचर्ना मढवी, आरती मढवी, मधुरा चवरकर, वैशाली गुरव, श्रावणी साखरे, मेघा उर्मिला मोकल,तबसुम,कल्पना पाटील, दर्शना बताले, महिला वर्ग तसेच प्रगती मॅम, पुनम शिंदे, नमिता शिंदे व इतर बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या सर्वांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा