आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १२ जुलै, २०२६

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथील दोन आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप कार्यक्रम नुकताच (दि. ११ जुलै, २०२६रोजी) आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील आणि कुटूंबीय यांनी शैक्षणिक साहित्य आणि छत्र्या उपलब्ध करुन दिल्या. तसेच सामाजिक कार्यकर्त्या विद्या पारकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना दप्तर उपलब्ध करून दिले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. कांबे केंद्राचे केंद्रप्रमुख उल्हास पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा कविता पाटील, नेहा पाटील-पिठडिया, हितेंद्र पिठडिया, अवनी पिठडिया आणि वृषाली हाडळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ह्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, छत्र्या व खाऊ यांचे वाटप करण्यात आले. राईपाडा शाळेचे मुख्याध्यापक विशाल आरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप करीत असते. यावर्षी ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, छत्र्या आणि खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनघा पाटील, पूर्वा पाटील, विद्या पारकर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला या पाडयांवरील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप

मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...