गडब (अवंतिका म्हात्रे):भगवा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय कार्यकर्ता, पदाधिकारी कार्यशाळा, संघटनात्मक बैठक व मार्गदर्शन मेळावा तळोजा MIDC येथील तानिष्क हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. राज्यभरातील विविध जिल्हे व तालुक्यांमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. रामदास भाई पाटील, राज्य उपाध्यक्ष श्री. अमोल कोळेकर पाटील, सचिव श्री. संजय तन्ना तसेच संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. मनोजजी दुबे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.यानंतर विविध मान्यवरांनी संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.सर्वप्रथम सहसचिव श्री. पराग भोपी यांनी संघटन विस्तार, कार्यकर्त्यांची जबाबदारी, सामाजिक बांधिलकी आणि प्रभावी जनआंदोलन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर अॅड. मनोजजी दुबे यांनी कायदेशीर बाबी, नागरिकांचे अधिकार, प्रशासनाशी संवाद साधताना घ्यावयाची काळजी तसेच संघटनेच्या कार्यात कायद्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
यानंतर तालुकाध्यक्ष श्री. आकाश पाटील यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राबवावयाच्या उपक्रमांवर आपले विचार मांडले.
रायगड जिल्हाध्यक्ष श्री. पुंडलिक घासे यांनी जिल्हास्तरावर संघटना विस्तार, सदस्य नोंदणी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर राज्य उपाध्यक्ष श्री. अमोल कोळेकर पाटील यांनी संघटनेचे ध्येय, कार्यपद्धती, सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका, प्रशासनाशी कायदेशीर लढा, प्रभावी आंदोलने, माध्यमांशी संवाद आणि संघटन विस्तार याविषयी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष श्री. रामदास भाई पाटील यांनी भगवा टायगर ग्रुपच्या आगामी राज्यव्यापी उपक्रमांची घोषणा करत संघटना अधिक सक्षम व व्यापक करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.कार्यशाळेदरम्यान संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, आगामी आंदोलने, सामाजिक उपक्रम, कार्यपद्धती, माध्यमांशी प्रभावी संवाद, स्थानिक प्रश्नांवर जनआंदोलने आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा