गडब (अवंतिका म्हात्रे): दिव्यांग विभागामार्फत वर्ष २०२६ च्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज व नामांकन स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत www.awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून प्रत्यक्ष (Physical Mode) किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सादर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. ३१ जुलै २०२६ पर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्ज व नामांकनांचा वर्ष २०२६ च्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी विचार करण्यात येईल. नामांकनामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यानुसार सर्व आवश्यक माहिती भरावी. अर्जदाराने केलेली उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी वर्णनात्मक स्वरूपात स्पष्टपणे नमूद करावी. तसेच संबंधित कामगिरीची पुष्टी करणारी आवश्यक कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावीत. 'सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities)', 'श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities)' आणि 'श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका (Outstanding Creative Divyang Child)' या उपवर्गासाठी अर्ज करताना यूडीआयडी (UDID) कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्रता निकष, पुरस्कारांच्या विविध श्रेणी व इतर सविस्तर माहितीसाठी www.depwd.gov.in तसेच www.awards. gov.in या संकेतस्थळांवरील 'दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा' संदर्भ घ्यावा. रायगड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्था यांनी या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मंगेश पाटील यांनी केले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
समाजसेवा,पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाला 'मुंबई रत्न'चा बहुमान ;विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा 'मुंबई रत्न पुरस्कार २०२६'ने होणार गौरव
मुंबई ( उत्कर्ष गुडेकर ): युवा महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा