आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २२ जुलै, २०२६

डॉ.प्रभाकर कांबळे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ गौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई (प्रतिनिधी): विक्रोळी मुंबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष विशेष कार्यकारी अधिकारी गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या जडणघडणीत विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन 2026 चा मुंबई येथील स्वराज्य प्रतिष्ठान व हुतात्मा बाबू गेनू स्मारक समिती महाराष्ट्र यांच्या वतीने संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट परेल येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभ व पत्रकारिता प्रशिक्षण कार्यक्रमात " छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार " महाराष्ट्र राज्याचे आयपीएस अधिकारी पूर्व पोलीस महासंचालक राष्ट्रपती शौर्य गौरव पदक विजेते माननीय डॉ. सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मैत्री संस्थेचे अध्यक्ष सुरज भोईर यांनी केले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला असून प्रभाकर कांबळे यांनी गेली 25 ते 30 वर्ष सामाजिक, पत्रकारिता ,शैक्षणिक, कामगार व सहकार क्षेत्रात काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संस्था संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 300 हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या कार्याची दखल समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या " डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार "साठी निवड करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवा,पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाला 'मुंबई रत्न'चा बहुमान ;विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा 'मुंबई रत्न पुरस्कार २०२६'ने होणार गौरव

मुंबई ( उत्कर्ष गुडेकर ):  युवा महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदा...