आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २२ जुलै, २०२६

पजवा सेवा निवृत्त कर्मचारी,दि म्युनिसिपल मजदूर युनियन आणि उप.प्रमुख अभियंता(पजवा) यांच्या बैठकीत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा

मुंब‌ई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) मुंबई महानगर पालिकेतून एखादा कर्मचारी निवृत्त झाला की त्यांची देय्य रक्कम, सेवा निवृत्त लाभ दिले जातात, आणि काही लाभ प्रशासनाकडून देणे टाळले जाते,त्यांच अनुषंगाने पर्जन्य जलनि:सारण खात्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकताच दादर येथील पजवा कार्यशाळेतील आलीशान सभागृहात उप.प्रमुख अभियंता(पजवा), म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने आणि पजवा सेवा निवृत्त कर्मचारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.त्याअगोदर सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुंबईच्या महापौर सन्माननीय सौ.रितु तावडे, म्युनिसिपल मजदूर युनियन यांजकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.महापौरांनी आपला अभिप्राय पजवा कार्यालयाकडे पाठविला, म्युनिसिपल मजदूर युनियनेही पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला.आयोजित केलेल्या बैठकीत१०/२०/३०नुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली काही कामगारांची कार्यवाही पुर्ण झाली आहे त्याचे लाभ त्यांना मिळतील उर्वरित कर्मचाऱ्यांची कार्यवाही चालु यथावकाश त्यांना त्यांचे लाभ मिळतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.सर्व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्विस रेकॉर्ड एका महिन्यात देण्याचे पजवा प्रशासनाने कबूल केले आहे.प्रशासनाकडे कार्यालयीन कर्मचारी वर्ग कमी असल्याकारणाने थोडी दिरंगाई होत आहे.सेवा निवृत्त कर्मऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दस्ताऐवज, कार्यालयीन काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी उपलब्ध करुन देण्यासाठी युनियन सरचिटणीस रमाकांत बने सर पुढाकार घेतला आहे.तसेच कर्मचारी उपलब्धतेसाठी उप.प्रमुख.(पजवा) यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करावा असेही बैठकीत ठरविण्यात आले.तसेच थकीत ओवर टाइम संदर्भात पडताळणीसह कार्यवाही चालू आहे.शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा लाड-पागे आयोगानुसार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यांला मुंबई महापालिकेत सामावून घेण्यासंदर्भात.म्युन्सिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.कायदेशीररित्या लढा देऊन सर्व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन हा लढा पुढे नेत यश प्राप्त करायचे आहे.तसेच जे कर्मचारी२०२३नंतर निवृत्त झाले आहेत, त्यांना तीन कालबद्ध पदोन्नती मिळणार आहेत, त्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वतः कार्यालयाकडे अर्ज सादर करावायाचे आहेत, असे सुचित करण्यात आले.एकंदरीत सर्व चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात सकारात्मक झाली.या चर्चेत उप.प्रमुख अभियंता(प.ज.वा.),दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने,प्रशासन कर्मचारी, सेवा निवृत्त कर्मचारी चंद्रकांत तेलंगे, शंकर नितनवरे, शिवाजी पवार, विजय जाधव, गौतम कांबळे आणि इतर सेवा निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

समाजसेवा,पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाला 'मुंबई रत्न'चा बहुमान ;विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा 'मुंबई रत्न पुरस्कार २०२६'ने होणार गौरव

मुंबई ( उत्कर्ष गुडेकर ):  युवा महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदा...