रविवार, २६ जुलै, २०२६
प्राचार्य द. गो. सामंत स्मृती चषक स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई : शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या आवारात प्राचार्य द. गो. सामंत स्मृती चषक स्पर्धा आजच्या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये परिसरातील विविध शाळांमधील 600 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून या वर्षाची मुख्य थीम पर्यावरण ही ठेवण्यात आली होती.पर्यावरणावर आधारित विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आला. ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, जनरल नॉलेज व समूह नृत्य स्पर्धा यांचा समावेश होता. शैलेंद्र निसर्ग मंडळातर्फे समूह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गटात झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश देणारे नृत्य सादर करण्यात आले. शैलेंद्र निसर्ग मंडळाच्या प्रमुख श्रीमती मानसी संखे मॅडम यांनी सदर नृत्यासाठी गीत रचना स्वतः केली होती. या नृत्यास शाळेतील शिक्षिका सौ गवळी मॅडम यांचे देखील मार्गदर्शन लाभले.शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे मराठी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री रामचंद्र कुंभार सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या मेहनतीने स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थेत लोकनेते आदरणीय स्व अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुषवगुच्छ अर्पण करून विनम्र अभिवादन!
गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मन्नत मल्टीपर्पज असोसिएशन संस्थे मध्येलोकनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा