मुंबई (शांताराम गुडेकर ): आर्यारवी एंटरटेनमेंट या फिल्म इंडस्ट्रीज संस्थेकडून लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांना स्वाभिमान लेखणी पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक १२/७/२०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरेंद्र गावस्कर हाॅल, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर पूर्व मुंबई येथे होणार असून या सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
हा पुरस्कार लोक निर्माण वृत्तपत्राच्या पोर्टल ला मिळालेला असून हे पोर्टल २०१९ पासून सुरू आहे. या पोर्टलवर १० लाखांहून अधिक वाचक आहेत. लोकनिर्माण च्या शिरोपेचात आतापर्यंत ४९ पुरस्कार मिळाले आहेत. आताचा हा पन्नासावा पुरस्कार आहे. लोक निर्माण वृत्तपत्राच्या पोर्टल ला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा