या सोहळ्यात लोककला आणि लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध कलावंतांचा ‘लावणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नुकतीच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त जयेश चाळके, अध्यक्षा कविता घडशी, सरचिटणीस विशाल सदाफुले, खजिनदार योगिता मोर्जे आणि समन्वयक विजय कर्जावकर यांनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व नामवंत संगीतकार मधुकर रेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच लावणी गौरव पुरस्कारासाठी शाहीर आनंद सावंत, लावण्यवती कविता घडशी, लोककलावंत चंद्रकांत बारशिंगे, गायिका श्रद्धा साळवी, निर्माते शंकर पिसाळ, गायक राजेश धाऊस्कर, ध्वनी संयोजक संदेश गायकवाड, तालवादक दीपक गायकवाड आणि पुरुष लावणी कलावंत चंद्रकांत तांबे यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय ‘राजा-राणी पुरस्कार’ श्री. सुनील खंडागळे व सौ. मयुरी सुनील खंडागळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कारांची घोषणा करताना महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, या सोहळ्याला लावणी आणि लोककला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा