आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ११ जुलै, २०२६

आंगवली विकास मंडळ मुंबई संचलित, जनता विद्यालय आंगवली या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा !!

जनता विद्यालय आंगवली प्रशालेतील दोन विद्यार्थिनी इ. आठवी शिष्यवृती परीक्षा 2026 मध्ये गुणवत्ता यादीत
मुंबई (शांताराम गुडेकर ): रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालूक्यामधील आंगवली विकास मंडळ मुंबई संचलित,जनता विद्यालय आंगवली या प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळा व परिसराचे नाव रोशन केले आहे. कुमारी स्वरा अमोल प्रभावळकर व कुमारी श्रृती संतोष भिसे यांची शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
               यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए. आर.चव्हाण,शिक्षक सौ.के व्ही जाधव,श्रीम.एस. जी पेडणेकर व श्री.एस.एच जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच संस्था पदाधिकारी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा विद्यार्थिनींच्या यशामध्ये महत्त्वाचे ठरले विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून आंगवली सारख्या ग्रामीण भागातील शाळेतून विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण तालुक्यातील मत्स्यशेतकऱ्यांना पूराचा फटका'! भरीव मदतीची मागणी - राजेंद्र झेमसे

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्मा...