आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ११ जुलै, २०२६

वाशी ग्रामपंचायतीची नागरीकांकडून लूट ; असिसमेंट काढण्यासाठी ५० रु अकारल्याचा आरोप, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

गडब (अवंतिका म्हात्रे): वाशी खारेपाटाच्या सद्याच्या पूरपरिस्थितीत लोक एकमेकांना मदतीचा हात देत असताना, वाशी ग्रुप ग्रामपंचायती कडून नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या असेसमेंटवर ₹५० शुल्क आकारले जात आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शासनाने निश्चित केलेले शुल्क या पेक्षा कमी (₹२०) असतानाही मासिक सभेच्या ठरावाच्या नावा खाली वाशी ग्रामपंचायती कडून वाढीव शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा संकट काळात ग्रामपंचायतीने तातडीची बैठक घेऊन पूरग्रस्तांना असेसमेंट मोफत किंवा किमान शासनाने निश्चित केलेल्या दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. नागरिक अडचणीत आणि व्यापलेले असताना त्यांच्या वर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्यतर नाहीच, शिवाय माणूसकिलाही धरून नाही. अशा प्रकारे नियमबाह्य किंवा अवाजवी शुल्क ग्राम पंचायती कडून आकारले जात असेल, तर वाशी-ओढांगी-सरेभाग ग्रामस्थांनी त्या विरोधात जागरूकपणे व कायदेशीर मार्गाने आवाज उठवण्याची आवश्यकता आहे
    याच बाबीचा गांभीर्याने विचार करून राजेंद्र झेमसे आणि इतर शेतकरी यांनी गटविकास अधिकारी लेंडी यांना विचारणा केली असता जास्तीत जास्त 20 रु आकारले जाऊ शकतात. 50 रु शासन निर्णयाच्या बाह्य असल्याचे सांगीतले आहे
यामुळे तातडीने ग्रामसेवकाला जाब विचार  असताना, दूरध्वनी वरून विचारणा केली असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण तालुक्यातील मत्स्यशेतकऱ्यांना पूराचा फटका'! भरीव मदतीची मागणी - राजेंद्र झेमसे

गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्मा...