संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करीत असते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कविता पाटील, सुदाम सुतार आणि गोगादे केंद्राचे प्रमुख दत्ताराम कोठेकर आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या आदिवासी पाड्यांवरील शिक्षक सुवर्णा हंकारे, ओंकार पवार, मदन मुंगळे, उमेश गायकर, सुनील गोळे, नितीन जाधव, विक्रम गायकवाड, दिनकर भोईर यांनी खूप मेहनत घेतली. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवार, २७ जून, २०२६
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप
पेण (प्रतिनिधी ): श्री. विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप, राष्ट्र सेवा दल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने म्हैसकोंड, पानेड, निंबारवाडी,खरबाची वाडी, काटीची वाडी, राजमाची ता. पेण, जिल्हा रायगड येथील सहा आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोट वाटप कार्यक्रम दि. २७ जून रोजी आयोजित केला होता. संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगितल्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सदस्या सोनम कोपरकर ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोट आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा