आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २७ जून, २०२६

माटवण हायस्कूलच्या एस.एस. सी बॅच १९९२ चा शाळा सदिच्छा भेट दशकपूर्ती सोहळा संपन्न

दापोली (प्रतिनिधी):आर.जी.पवार माध्यमिक शाळा माटवण ची १९९२ एस एस सी बॅच २०१७ पासून आपल्या शाळेला सदिच्छा भेट देत आहे . या माध्यमातून या बॅचने शाळेला आतापर्यंत लाखो रुपयांचं अर्थसहाय्य वस्तुरूपाने केले आहे.
       या उपक्रमाचं हे दहावं वर्ष असल्यामुळे यावर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी श्रीराम शिक्षण संस्था माटवणचे अध्यक्ष विजय पवार साहेब,बजाज स्कूटर मार्केटिंग हेड अग्रवाल साहेब,नवी मुंबई येथील प्रथितयश डॉक्टर संदेश देवळेकर, १९९२च्या बॅचचे वर्गशिक्षक श्री जी एन पाटील सर , संस्थेचे उपाध्यक्ष संजय महाडिक व दत्ताराम महाडिक,सचिव श्रीराम महाडिक तसेच सर्व पदाधिकारी व संचालक कार्यक्रमाला उपस्थित होते.
      १९९२ च्या बॅचचं काम समाजात सर्व दूर पोहोचण्यासाठी व त्या माध्यमातून शाळेला भरघोस मदत करण्याच्या उद्देशाने बॅच ने मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयात ' मैत्रीबोध प्रतिष्ठान 'या नावाने नोंदणी केली आहे.त्याचे औपचारिक उद्घाटन देखील यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब व प्रमुख पाहुणे अग्रवाल साहेब तसेच डॉक्टर देवळेकर यांच्या शुभहस्ते पार पडले . 
        गेले दहा वर्ष १९९२ च्या बॅच ने शाळेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कोंडीकिरे सर यांनी आपल्या प्रस्ताविकात माहिती दिली.तसेच संस्थेचे सचिव श्रीराम महाडिक,उपाध्यक्ष दत्ताराम महाडिक,संजय महाडिक,अध्यक्ष विजय पवार तसेच प्रमुख पाहुणे अग्रवाल साहेब आणि डॉक्टर देवळेकर यांनी आपल्या मनोगतातून ९२ बॅच अर्थात मैत्रीबोध प्रतिष्ठानचे तोंड भरून कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
       याच दिवशी मैत्रीबोध प्रतिष्ठान चे सचिव,माटवण हायस्कूलचे शालेय समिती चेअरमन श्री.दीपक पवार सर यांचा वाढदिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेने हार्दिक शुभेच्छा दिल्या सरांनी सगळे विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था संचालकांसाठी स्वतःभोजनाची व्यवस्था शाळेमध्ये केली होती.
     दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या,पेन,खाऊचे वाटप बॅचच्या वतीने केले गेले.यावर्षी विद्यार्थ्यांची पाण्याची समस्या ओळखून मैत्री बोध प्रतिष्ठानने शाळेला पन्नास हजार किमतीचे वॉटर कुलर देण्याचे जाहीर केले.याबद्दल शाळेने बॅच चे धन्यवाद व्यक्त केले.यावेळी राजेश कोलुगडे यांनी शाळेला संत तुकारामांची एक अतिशय सुंदर मूर्ती भेट स्वरूपात दिली.बॅच च्या वतीने सचिव दीपक पवार,अध्यक्ष विलास जाधव सदस्या पिंकी माटवणकर यांनी आपल्या मनोगतातून आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या बॅचचे वर्गशिक्षक जी एन पाटील सर यांनी आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या कामाची आणि त्यांच्या त्यागाची प्रशंसा केली.शाळेच्या वतीने श्री खाडे सर बॅचच्या वतीने विवेक महाडिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
           विशेष म्हणजे आलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे व १९९२ बॅच च्या विद्यार्थ्यांचे शाळेकडून झांज पथकाच्या नृत्य अविष्काराने सलामी देऊन जोरदार स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...