सध्या व्यावसायिक मराठी रंगभूमीवर 'तरंगिणी एंटरटेनमेंट' आणि 'नवनीत' निर्मित तसेच प्रमोद शेलार लिखित व दिग्दर्शित 'शिक्कामोर्तब' या नव्या कोऱ्या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग पाच हाऊसफुल्ल प्रयोग करत या नाटकाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली असून, विनोदाची चौफेर टोलेबाजी करणारे हे नाटक सध्या नाट्यवर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. एका जोडप्याच्या आयुष्यात अचानक दुसऱ्या जोडप्याची एन्ट्री होते आणि त्यानंतर उडणारा गोंधळ या नाटकातून अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. केवळ वरवरचा विनोद न मांडता, कोणत्याही नात्याला अधिकृतरीत्या 'शिक्कामोर्तब' करणे किती गरजेचे असते, हा सखोल संदेश दिग्दर्शक प्रमोद शेलार यांनी अत्यंत रंजक पद्धतीने दिला आहे. या नाटकाच्या निमित्ताने सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे आणि स्नेहा पराडकर ही कसलेली कलावंत मंडळी पहिल्यांदाच एकत्र आली आहेत. रंगभूमीशी नाळ जुळलेल्या सागर कारंडेने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तर मंचावर येताच टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पाडणारा कांचन पगारे यांचा 'बंगाली मजनू' आणि भक्ती रत्नपारखी यांची नटखट 'लैला' यांची केमिस्ट्री नाटकाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. 'वकिला'च्या भूमिकेत स्नेहा पराडकर यांनीही आपली घट्ट पकड निर्माण केली आहे. महेंद्र खराडे (निर्मिती प्रमुख), संदेश बेंद्रे (नेपथ्य) आणि शीतल तळपदे (प्रकाशयोजना) यांनी नाटकाला तांत्रिक दृष्ट्या भक्कम केले असून अभिजित पेंढारकर यांच्या संगीताने नाटकाची रंगत वाढवली आहे. हसवता हसवता प्रेक्षकांना अंतर्मुख करणारी आणि वेगळ्या धाटणीची ही नाट्यकृती प्रत्येक नाट्यप्रेमीने आवर्जून पाहावी अशीच आहे. प्रेक्षकांनी जवळच्या नाट्यगृहात जाऊन आपल्या हक्काच्या तिकिटावर या मनोरंजनावर 'शिक्कामोर्तब' करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या 'फिनिक्स' पक्ष्यांचा 'वर्षा'वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
मुंबई( महेश्वर भिकाजी तेटांबे): संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा