आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २ मे, २०२६

डोंबिवली येथील आगरी समाज प्रबोधन संस्था आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात साजरा ; सोहळयाचे यंदा ६ वे वर्षे

मुंबई : (सतिश पाटील ) पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान,मानपाडा रोड,सागांव डोंबिवली पूर्व येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो.
आतापर्यत सामुदायिक विवाह सोहळयात ३९ शुभलग्न धुमधक्यात संपन्न झाले आहेत. यंदा ७ शुभविवाह धुमधडाक्यात पार पडली. याचे श्रेय आगरी समाज प्रबोधन संस्था सर्व कार्यकर्ते तसेच मा. आमदार राजूदादा पाटील यांना जाते. कारण प्रत्येक जोडप्यास एक लाख रूपये मानधन दिले जाते. आणि पुढेही देणार भले कितीही लग्न जुळूदे असे मा.आमदार राजूदादा पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्यांनी संस्थेचे ही कौतुक केले.ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे अशा लोकांनी जरूर आपल्या कुवती प्रमाणे लग्न कार्यात खर्च करावा. पण कर्ज काढून आयुष्यभर हप्ते भरत बसू नये. त्याला पर्याय म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेत नाव नोंदणी करून सामुदायिक विवाह सोहळा उत्तम पर्याय आहे. 
        येथे आपल्या घराच्या सारखा लग्नसोहळा आयोजित केला जातो. वधुवर व आपले वराडी उपस्थित राहायचे आहे. भटजी,हारतुरे, पोळापापडी, सर्व धार्मिक विधी होम हवन, स्टेज,डेकोरेशन, बुफे
जेवणापासून,आईसक्रीम, वेलकम ड्रीक, बँड बाजा, वरात उपलब्ध करून दिले जाते, कशाचीही कमी नसते. त्यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्थेचे कार्यकर्ते नोव्हेंबर पासून वधुवर फोटो व बायोडाटा सह नोंद करून मेळावे भरवते. इच्छुक वधुवर व नातेवाईकांना समोरासमोर बोलून पंसती केली जाते अविरत व दिवसरात्र निमंत्रण पासुन ते मदतीचा निधी गोळा करण्याचे काम आपल्या घरचेच लग्न समजून आवडीने करत असतात.प्रत्येक जण कामे वाटून घेतात. संस्थेत काही रिटायर्ड तर काही आपला कामधंदा सांभाळून वेळ देतो."ऐकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" संस्थेचे उद्दिष्ट कोणी आर्थिक अनावश्यक खर्च व कर्ज करू नका. फक्त आपली वधुवर नोंदणी करा आपल्या प्रथा व परंपरा जपा वायफळ अनावश्यक खर्च टाळा. काहीचा गैरसमज अमुक लोक सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेतात.पण यावर्षी वकीली केलेले वधुवरही सहभागी झाले होते. या सोहळ्यात सर्व पक्षीय नेते, समाज बांधव, प्रतिष्ठित मंडळी सहभागी होवून वधूवरांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा देतात. या महान समाजकार्याला वस्तूरुपी आणि पैसे रुपात सढळ हस्ते मदत करणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद! दिल्याने धन कमी होत नाही आणि सत्कार्य केल्याचा आनंद व अभिमान वाटतो मी काहीतरी मदत केली जीवन सार्थकी लागले "मानव जन्म एकदाच नाही पुनर्जन्म"!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन

वृत्तपत्र लेखकांचे काम समाजासाठी जागल्यांचे - पद्मश्री उदय देशपांडे    मुंबई (रवींद्र मालुसरे ) : समाजातली एखादी गोष्ट चांगली अस...