आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ मे, २०२६

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण

मुंबई (प्रतिनिधी ): मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री. मधू शिरोडकर यांच्या "कालप्रवाह " या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र दिनी १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५. ३० वा. मामा काणे हॉटेल सभागृह, तळमजला, दादर रेल्वे स्टेशन पश्चिम जवळ आयोजित करण्यात आला आहे असे संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी कळविले आहे. गेल्या ६० वर्षात शिरोडकर यांनी लिहिलेली पत्रे, लेख आणि वृत्तांत याचा समावेश यांचा या पुस्तकात समावेश आहे. 
     कार्यक्रमाला पद्मश्री मा. उदय देशपांडे,
दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, माजी नगरसेवक अभिजित ग शं. सामंत, संघांचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी प्रमुख कार्यवाह नंदकुमार रोपळेकर, दत्ताराम घुगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यावेळी सर्वश्री अरुण खटावकर, लीना वालावलकर श्रीनिवास डोंगरे, राजन देसाई, भाऊ सावंत, दीपक गुंडये, गुरुनाथ तिरपणकर, संजय साळगावकर, सूर्यकांत भोसले, अनंत दाभोळकर, नितीन कदम, दत्ता खंदारे,शिरीष बने, कमलाकर जाधव, पंकज पाटील, रामचंद्र जयस्वाल या पत्रलेखकांचा संघाच्या वतीने "निर्भीड जागल्या " पुरस्कार प्रदान करून यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
   महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणसांचे मूलभूत प्रश्न सातत्याने सेवाभावीवृत्तीने व निर्भीडपणे आपल्या लेखणीतून सातत्याने पदरमोड करून हे वृत्तपत्र लेखक जनजागृतीचे काम हे करीत आहेत. मुंबई - ठाण्यातील सर्व वृत्तपत्रलेखकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन
कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण

मुंबई (प्रतिनिधी ): मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक श्री. मधू शिरोडकर यांच्या "कालप्रवाह ...