आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ मे, २०२६

भारतीय मानवाधिकार संस्थेच्या राज्यस्तरीय व कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांनी श्री. मनुज जिंदाल रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची त्यांच्या जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेट

रत्नागिरी(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
यावेळी संस्थेच्या प्रमुख पदाधिकारीनी कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिले. यामध्ये संस्थेची ध्येयधोरणे व कार्यक्रम यांची विस्तृत माहिती देण्यात आली. 
   याबद्दल अधिक भाष्य करताना संस्थेचे श्री. विवेक जाधव राज्य प्रभारी अधिकारी म्हणाले की आमची संस्था गेली २७ वर्ष जुना NGO असुन देशभरात जवळपास सर्वच राज्यांत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आजमीतीस संस्थेचे महाराष्ट्रात ३५ हजाराहून अधिक कार्यकर्ते जमीनीस्तरावर काम करीत आहेत.गोरगरीबांना त्यांच्या समस्यांप्रती सनदशीर मार्गदर्शन व साहाय्य, प्रसंगी समुपदेशन हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. तसेच यासोबत आम्ही केंद्र/ राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती जनतेपर्यंत पोहचवतो व त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता रितसर प्रयत्न करतो.
     याप्रसंगी श्री गजानन लाड साहेब, राज्य प्रमुख प्रशासकीय संरक्षण यांनी आपली ओळख करून देताना म्हणाले, आमचे सध्या कोकण विभागांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात जोमाने कार्य सुरू आहे.लवकरच आम्ही या जिल्ह्यातील स्थानिक जनतेकरीता त्यांच्या विविध समस्यांवर व्यापक कायदेशीर सल्ला व मदत प्रबंधन करणार आहोत. याची माहिती देण्यासाठी आज आपली भेट घेतली. 
     यावेळी श्री गजानन फडकले राज्यप्रमुख आर्थिक संरक्षण समिती यांनी त्याना संस्थापक श्री अनुराग चंद्रवंशीजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रविवार १७ मे रोजी एकदिवसीय राज्य अधिवेशन आणि त्याचदिवशी राज्य कार्यालय उद्घाटन मुंबई येथे होणार आहे, याची माहिती दिली.
    याप्रसंगी संस्थेचे श्री. प्रदीप किर अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा पोलीस संरक्षण समिती, श्री प्रणेश मयेकर उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा पोलीस संरक्षण समिती, श्री अरूण जाधव अध्यक्ष जिल्हा सामाजीक संरक्षण समिती व श्री अनिल फडकले उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा सामाजीक संरक्षण समिती व श्री दिपक सांबरे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा आरोग्य संरक्षण समिती व अन्य सदस्य गण उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्याना पुष्पगुच्छ देण्यात आला व भेटीची संधी दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेणमध्ये ऑनलाईन संमतीविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र निषेध!

पेण :अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील १२४ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील ऑनलाईन संमतीपत्र पद्धती विरोधात पेणमध्ये शेतकऱ्यांनी दि....