आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १ मे, २०२६

सामान्य जनतेचा लढवय्या - सुमित बोराटे

    कामगार आणि श्रमिक वर्ग देशाचा आधारस्तंभ आहेत. त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे.परंतु अनेकदा कामगार वर्गाला अनेक समस्यांशी झुंज द्यावीच लागत आहे. त्यांच्यासाठी एक ठाम नेतृत्व असणं गरजेचं आहे.
     हल्लीच वाढत आधुनिकीकरण हे चांगलच आहे पण अनेकदा काम करून सुद्धा कर्मचारी वर्गाला त्याचा मोबदला दिला जात नाही किंवा कामाच्या ठिकाणी त्यांच्यासोबत होणारी गैरवर्तणूक, पिळवणूक तसेच कामगारांचे हक्क, सार्वजनिक सुरक्षा, समाजकल्याण आणि वादांचे निवारण ह्यासाठी ते सुमित बोराटे नेहमीच सक्रिय असतात.
ठाण्यातील त्यांची उल्लेखनीय कामे

*गिग कामगारांचे वाद (Gig Worker Disputes): त्यांनी ठाण्यातील 'ब्लिंकिट' (Blinkit) आणि 'ॲमेझॉन फूड ग्रोसरी' (Amazon Food Grocery) सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या थकीत पैशांच्या वादात मध्यस्थी करून त्यांना त्यांचे पैसे मिळवून दिले आहेत.

*नागरिकांच्या तक्रारी: भाडेकरूंच्या बेकायदेशीर ताबा प्रकरणांपासून ते कॉलेजच्या फी परताव्याच्या विलंबापर्यंतच्या नागरी समस्या ते सक्रियपणे हाताळतात.

*सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षा: खाजगी बिल्डरांनी दुर्लक्षित केलेल्या तुंबलेल्या गटारांसारख्या नागरी समस्यांबद्दल त्यांनी आवाज उठवला आहे. तसेच आझाद नगर येथील भीषण आगीच्या वेळी अग्निशामक दलाशी समन्वय साधून मदत केली होती.
     त्यांच्या ह्या अशा सामाजिक कार्याने अनेकांना एक नवी ऊर्जा मिळत आहे.नागरिकांच्या समस्यांसाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मी प्रत्येक वेळी उभा असेन आणि माझं समाजकार्य असच सदैव करत राहीन हा संदेश त्यांनी महाराष्ट्र दिन व कामगारदिनाच्या निमित्ताने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेणमध्ये ऑनलाईन संमतीविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र निषेध!

पेण :अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील १२४ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील ऑनलाईन संमतीपत्र पद्धती विरोधात पेणमध्ये शेतकऱ्यांनी दि....