मुंबई : वृत्तपत्रलेखकांची प्रातिनिधिक संघटना असलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्याही दैनिकात प्रसिद्ध झालेल्या एका पत्राची झेरॉक्स "सर्वोत्कृष्ट पत्र स्पर्धेसाठी" दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत टपालाने पुढील पत्त्यावर मागविण्यात येत आहे. झेरॉक्सवर व्हाट्सअप मोबाईल नं. आणि ईमेल तसेच आजपर्यंत एकूण किती पत्रे प्रसिद्ध झाली असतील ते लिहावे. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख सुनील कुवरे यांच्याशी ९१६७३६४८७०
संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. पत्ता - दिगंबर चव्हाण (कार्यक्रम प्रमुख ) - ए /३४ जिजामाता नगर ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, मुंबई -४०००३३, मोबाईल : ७७१५९२४५८८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा