कल्याण:( सुनील इंगळे )जनरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव/मो.ह विद्यालय, ठाणे.चे मुख्याध्यापक/ शिक्षक आघाडीचे राज्य सहसंयोजक, आदरणीय विकास जी पाटील सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा !' उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यास संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी,तसेच शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य मंडळी अगदी पदवीधर शिक्षकआमदार निरंजनजी डावखरे (भाजप /को. वि.) सर्वांचे लाडके शिक्षक आमदार ज्ञानेश्वर जी म्हात्रे (को.वि.) यांच्यापासून तर विविध शिक्षकआघाडी प्रमुख,एन एम भामरे सर, प्रशांत भामरे सर,सुधीर घागस सर, विनोद शेलकर सर, प्रकाश माळी सर,अनिल बोरनारे सर, गुलाबराव पाटील सर, वर्षा पाटील मॅडम,ज्ञानेश्वर गोसावी सर, शब्बीर भाई शेख, प्रभाकर बोरसे सर, सुनील पाटील सर, उगलमोगले सर,विजय सरोदे सर, किशोर पाटील सर,मिलिंद बागुल सर, विनोद सर, बेंडाळे सर,मगनजी सूर्यवंशी असा भव्य शिक्षक वृंद उपस्थित होता.शिक्षकेतर.. खानदेश मंडळाचे प्रकाश पा.अत्रे,सुनिल इंगळे,आशा ताई असे आपले सदस्यही उपस्थित होते.
सोहळ्याचे स्वरूप अत्यंत सुंदर,
सुव्यवस्थित आयोजन, नियोजन, सुव्यवस्थापन, अत्यंत देखणा !असा निवृत्तीसोहळा कदाचित कुठे झाला असावा याची शंकाच! संस्थेचे, शाळेचे सर्व ज्येष्ठ,श्रेष्ठ सन्मा.कमिटीवृंद, शिक्षक,शिक्षकेतर वृंद, सगळ्यांचाच भरभरून प्रतिसाद, सहभाग,पुढाकार अत्यंत वाखाणण्याजोगा...! आणि का नसावा! हा सोहळाच एका सुसंघटक, सुव्यवस्थापक, सुभाष्य, शिक्षणप्रेमी, कलाप्रेमी, विज्ञान प्रवर्तक, द्रष्टा, समाज/संस्कृती अनुयायी...नावातच ज्यांच्या ’विकास’ आहे अशा एकाअवलियाचा होता ! खरं सांगायचं म्हणजे..हा सोहळा बघण्यापेक्षा अनेक पटीने सुश्राव्य होता.संस्थेच्या वरिष्ठांपासून तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत जे सरांच्या कामाचे/कार्य शैलीचे, त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचे,गुणांचे, त्यांच्या संघटन कौशल्याचे,ज्या शब्द सुमनानी वर्षाव केला, त्यात सरच नाही तर आम्ही सर्व,म्हणजे इष्टमित्र/आप्तेष्ट अगदी चिंब भिजलो!अगदी 15 महिन्यांच्या अल्पावधीत त्यांच्या कार्याची नोंद घेणारी वरिष्ठांची कौतुक सुमने सुवर्ण लेखणीतुन अवतरल्यासारखी होती. सर्व कुटुंबीयांनी, ईष्टमित्रांनी अनुभवलेले विकास पाटील सर जेव्हा प्रत्येकाच्या अनुभवातून उलगडत गेले तेव्हा ते आणिक प्रगल्भ होत गेले.कन्या-पुत्र वरद/साक्षी यांच्या कडून एक बाप माणसाने कितीही उंची गाठली,तरी बाप म्हणून तो जेव्हा वागतो,जगतो तेव्हा सर्व काही कसा विसरतो....
तसेच सालस वैशाली ताई कडून आपल्या स्वार्थ त्यागामुळे,'सोन्याचा दिवस उगवला आज तो सर्वांनी अनुभवला' याचा आनंद ओसंडूनही नि:शब्द होणे कसे हे अनुभवले! एकंदरीत हा आगळा वेगळा सोहळा,'जणू विठू माझा लेकुरवाळा',असा भासत होता!सर,आपण शासन नियमानुसार निवृत्त झाले असले तरी,आपली काही कामे अशीच किंबहुना आणिक गतीने सुरूच असतील.. मग ती शैक्षणिक, सामाजिक, राजकीय.. कुठल्याही क्षेत्रातली असली तरी!
आपल्या पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा!.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा